"उद्योग कर उद्योग "ह्या व्यवसाय संधी मेळाव्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील इच्छुक उपस्थित!! मनसेचे आदरणीय सौं. शर्मिला वहिनी ठाकरे आणि रिटाताई गुप्ता ह्यांची ह्या मेळाव्याला भेट.

1 / 1

आज दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबई येथे विविध क्षेत्रातील प्रॉडक्ट्स च्या फ्रँचायसी उपलब्ध केल्या होत्या आणि ह्या फ्रँचायसी घेण्याकरिता केंद्र आणि महाराष्ट्र शासन धोरणातर्गत स्टेट बँक ऑफिस इंडिया चे व्यवस्थापकीय अधिकारी उपास्तिथ होते.
ह्या मेळाव्यात 42 उद्योजकांनी भाग घेतला होता शिवाय ह्या साठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून तरुण तरुणी सहभागी झाले होते.
सदर मेळाव्यात शर्मिलाताईंनी अमित साहेब ठाकरे आणि मिताली ठाकरे सून आणि उर्वशी ठाकरे मुलगी ह्यांची व्यवसाय संदर्भात उदाहरणे देऊन" लोकांची चाकरी करण्यापेक्षा व्यवसाय करून उद्योजक व्हा" असा मोलाचा मंत्र दिला.
ह्या मेळाव्यात प्रवीण मांजरेकर ह्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.प्रवीण ह्यांनी विविध क्षेत्रातील 8 फ्रंचायसी घेऊन यशस्वी व्यवसाय करत आहेत.
शिवाय कवीक ऑटोचे संस्थापक नितीन गोरीवले ह्यांचाही जाहीर सत्कार करण्यात आला.नितीन गोरीवले ह्यांच्या भारत भर क्विक ऑटो मोटार गॅरेज शाखा आहेत.
ह्या प्रसंगी शर्मिला वहिनींच्या शुभ हस्ते
"महाराष्ट्र उद्योग "वेबसाईट,
"महाराष्ट्र रोजगार वृत्त "ह्या साप्ताहिकच्या नवीन वृत्तीचे प्रकाशन करण्यात आले तसेच "अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्रचे" दिनदर्शिका 2024 चे सुद्धा प्रकाशन करण्यात आले.
ह्या मेळाव्यासाठी QUICK AUTO हे मुख्य प्रयोजक तसेच टाटा मोटर SHAW MOTOR,NKGSB, E VISHWA, हे सह प्रयोजक होते.
ह्या मेळाव्यासाठी विविध महामंडळे, विविध बँका, विविध केंद्रातील योजनेचे अधिकारी उपस्तिथ होते.
अनिल फोंडेकर
सरचिटणीस
रोजगार स्वयंरोजगार
महाराष्ट्र नवनिर्माण सेना