केंद्र आणि महाराष्ट्र शासन धोरणातर्गत "उद्योग कर उद्योग" ह्या संकल्पनेच्या आधारित ह्या प्लॅटफॉर्म मधून तुम्हाला मिळणार, विना व्याज, विनंती तारण, विना जामीनदार व्यवसाय भांडवल!!!

1 / 1

शिवाय
आता मराठी उद्योजकच,*
*नवीन मराठी उद्योजक तयार* करणार...!
*महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उद्योजकांना आवाहन**
मराठी तरुणाई आणि व्यवसाय हे एक कधीही न जुळणारे समीकरण आहे असे अनेकांचे मत आहे. परंतु, या समिकरणाला दुजोरा देत महाराष्ट्र रोजगार संघटना आणि मुंबई व्यापारी असोसिएशन अध्यक्ष श्री. अनिल फोंडेकर हे मराठी तरुणांना उद्योग क्षेत्राकडे वळविण्यासाठी नेहमीच कार्यरत असतात.
आता कोरोना महामारी उलटून 3 वर्ष झाली. त्यामुळे सगळेच व्यवसाय परत एकदा स्वतःचे पाय रोवू लागले आहेत.
म्हणूनच पुन्हा एकदा महाराष्ट्र रोजगार संघटना आणि मुंबई व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून विविध ठिकाणी franchise आणि distributors उद्योग मेळावे सुद्धा आयोजित करण्यात आले आहेत आणि यशस्वीरीत्या पार पडले.
या उपक्रमाचा एकमेव उद्देश म्हणजे महाराष्ट्रातील मराठी उद्योजकांनी नवीन मराठी उद्योजक तयार करावे. शिवाय याला केंद्र आणि महाराष्ट्र शासन अनुदान योजना आहेतच उदा. - स्टॅन्ड अप इंडिया, मुद्रा लोन, व्याज परतवा, बीज भांडवल वगैरे आणि या व्यवसायांना विविध राष्ट्रीयकृत, सहकारी आणि कॉर्पोरेट बँका उदा. - नॅशनल बँक, सारस्वत बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, येस बँक, आयसीआयसीआय, एचडीएफसीबँक या विना तारण 50 लाख पर्यंत कर्ज द्यायला तयार आहेत.
पण यासाठी तुम्हाला कोणीतरी पुढे करण्यासाठी, तुमची मानसिकता, तुमची हिंमत वाढवण्याकरिता गेले कित्येक वर्ष अनिल फोंडेकर रोजगार स्वयंरोजगार चे काम करत आहेत. त्याचाच धागा पकडून अनिल फोंडेकर आणि त्यांची टीम तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी तुमच्यासाठी असलेले महाराष्ट्रातील उद्योगांचे विविध पॅकेज देण्याकरिता आवाहन करत आहेत की, ज्यांचे स्वतःच्या मेहेनतीचे, कल्पकतेचे विविध क्षेत्रातील प्रोडक्ट्स असतील त्यांनी या वेबसाईट वर स्वतःचे प्रॉडक्ट्स नोंदविण्याकरिता आवाहन करत आहेत.
आम्ही महाराष्ट्रतील तमाम स्थानिक मराठी तरुण तरुणीना आवाहन करत आहोत कि तुम्ही दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा व्यवसाय करून स्वकष्टाची भाकरी कमवा तरच तुम्ही तुमच्या करियरचे तुम्ही शिल्पकार व्हाल.
"मीं करेन उद्योग, मीं होईन उद्योजक" हे ध्येय उराशी बाळगून तुम्ही ह्या व्यवसाय करण्याच्या उंबरठ्यावर उभे राहा.