The Maharashtra Udyog

मराठी तरुणाई आणि व्यवसाय हे एक कधीही न जुळणारे समीकरण आहे असे अनेकांचे मत आहे. परंतु, या समिकरणाला दुजोरा देत महाराष्ट्र रोजगार 24 चे संपादक श्री. अनिल फोंडेकर हे मराठी तरुणांना उद्योग क्षेत्राकडे वळविण्यासाठी नेहमीच कार्यरत असतात. महाराष्ट्र रोजगारच्या माध्यमातून अनेक नोकऱ्यांचे रोजगार मेळावे तर घेतलेच पण तरुणांनी उद्योग क्षेत्राकडे वळावे म्हणून प्रथमतः 2019 मध्ये franchise आणि distributors मेळावा घेण्यात आला. तसेच कोरोनाआधी आणि कोरोनानंतर उनो फेस्टिव्हल म्हणजेच उद्योग आणि नोकरी जत्रा भरविण्यात आली होती. या फेस्टिव्हललादेखील महाराष्ट्रातील तरुणांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. कोरोनानंतर अनेक मराठी बांधवांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या असे ठळकपणे दिसून येत होते. अशा अनेकांना स्वतःचा लघुउद्योग सुरू करण्याची संधी मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या विविध महामंडळच्या माध्यमातून विना व्याज, विना तारण, विना जामीनदार यांवर आधारित अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्राचा शुभारंभ मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आला होता. या नंतर महाराष्ट्राच्या विविध राजकीय पक्षाच्या मान्यवर नेत्याकडून विविध व्यावसायिक फिरते विक्री केंद्र उदघाटन करण्यात आले. 9 ऑक्टोबर 2021 रोजी अवनि उत्सव हा कार्यक्रम आयोजित करून, ज्या लघुउद्योजकांनी अवनि व्हॅन घेतल्या आहेत त्यांचा मान्यवरांतर्फे सत्कार करण्यात आला होता आणि सध्या मुंबई, ठाणे, पालघर रायगड या जिल्ह्यामध्ये 107 अवनि लघुउद्योग व्हॅन जोमाने सुरू आहेत. आता कोरोना महामारी उलटून 2 वर्ष झाली. त्यामुळे सगळेच व्यवसाय परत एकदा स्वतःचे पाय रोवू लागले आहेत. म्हणूनच पुन्हा एकदा मुंबई व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून 25 मार्च 2022 रोजी franchise आणि distributors उद्योग मेळावा 2022 आयोजित करण्यात आला आणि तो देखील यशस्वीरीत्या पार पडला. या सर्व प्रयत्नानंतर मराठी बांधवांना स्वतःच्या व्यवसायासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देता यावे म्हणून “द महाराष्ट्र उद्योग” वेब पोर्टलची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाचा एकमेव उद्देश म्हणजे महाराष्ट्रातील मराठी उद्योजकांनी नवीन मराठी उद्योजक तयार करावे. शिवाय याला केंद्र आणि महाराष्ट्र शासन अनुदान योजना आहेतच उदा. – स्टॅन्ड अप इंडिया, मुद्रा लोन, व्याज परतवा, बीज भांडवल वगैरे आणि या व्यवसायांना विविध राष्ट्रीयकृत, सहकारी आणि कॉर्पोरेट बँका विना तारण 50 लाख पर्यंत कर्ज द्यायला तयार आहेत. पण यासाठी तुम्हाला कोणीतरी पुढे करण्यासाठी, तुमची मानसिकता, तुमची हिंमत वाढवण्याकरिता गेले कित्येक वर्ष अनिल फोंडेकर रोजगार स्वयंरोजगार चे काम करत आहेत. त्याचाच धागा पकडून अनिल फोंडेकर आणि त्यांची टीम तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी तुमच्यासाठी असलेले महाराष्ट्रातील उद्योगांचे विविध पॅकेज देण्याकरिता www.themaharashtraudyog.com या वेबसाईट द्वारे आवाहन करत आहेत की, ज्यांचे स्वतःच्या मेहेनतीचे, कल्पकतेचे विविध क्षेत्रातील प्रोडक्ट्स असतील त्यांनी या वेबसाईट वर स्वतःचे प्रॉडक्ट्स नोंदवावे. तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टची फ्रँचायसी आणि डिस्टरब्युटरशिप देता येईल पण खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला म्हणजेच स्थानिक भूमिपुत्रांना तुमचा व्यवसाय सोपवाल असा अनिल फोंडेकरना विश्वास आहे आणि महाराष्ट्रतील तमाम, स्थानिक मराठी तरुण तरुणींनो आता रडायचं नाही तर लढायचं म्हणत या महाराष्ट्र उद्योगच्या प्लॅटफॉर्मवरून “तुम्हीच व्हा तुमच्या व्यवसायाचे शिल्पकार!!” धन्यवाद जय हिंद, जय महाराष्ट्र