पावसाळा सुरू झाला आणि हा पाऊस असतोच असा जो प्रत्येकाला सुखावतो...

पावसाळा सुरू झाला आणि हा पाऊस असतोच असा जो प्रत्येकाला सुखावतो... जसे कुणाला गरमागरम चहा आणि पाऊस आवडतो तर कुणाला गरमागरम भजी, वडे, समोसे असे चमचमीत पदार्थ आवडतात तर काहींना पावसात छत्री अथवा रेनकोट घालून फिरण्यास आवडते. पण माझ्या मते तरी पावसाळा हा ऋतू सर्वांचाच आवडता असतो. मग या आवडत्या ऋतू मध्ये काही व्यवसाय करायला मिळाले तर अजूनच उत्तम होईल.... मग ते कोणते 

1. वाफाळता गरमागरम चहा

चहा आणि पाऊस हे समीकरण भल्याभल्यांना सुटत नाही आणि या समीकरणाचा धागा पकडून अनेक जण वाफाळता गरमागरम चहाचा व्यवसाय हा करू शकतात. तसेच साधा चहा स्पेशल चहा बासुंदी असे एक ना अनेक चहाचे प्रकार तेथे उपलब्ध करू शकता येतील.

2. गरमागरम भजी वडे समोसे

वाफाळता चहा आणि गरमागरम भजी आणि ती देखील कांदा भजी हे पावसाळ्याची खरी खासियत आहे. म्हणजेच एखादी व्यक्ती कांदा भजी आणि चहा हा देखील व्यवसाय करू शकते आणि त्याचसोबत वडे समोसे किंवा मक्याचे कणीस असे अनेक पावसाळ्यातील खास असणारे पदार्थ देखील ठेवून हा व्यवसाय करता येईल.

3. पावसाळी साहित्य विक्री

पावसाळा म्हंटल की पावसाळ्यातील साहित्य हे सर्वांसाठीच खूप महत्त्वाचे असते म्हणजेच छत्री, रेनकोट शूज असे विविध साहित्य पावसाळ्यात सर्वांना उपयोगी येतात. तसेच पावसाळयात प्लास्टिक कॉव्हरची मागणी हि मोठ्या प्रमाणात वाढत असते. मग ते कव्हर मोबाईल चे कव्हर, दुचाकी, चार चाकी चे असतात किंवा बॅग चे देखील कव्हर असतात. तर हे सर्व एकत्रित व्यवसाय किंवा स्वतंत्र व्यवसाय देखील कोणतीही सहज करू शकते. 

4. नर्सरीतील रोपे

पावसाळा आला की अनेकांची बागकामाची आवड फुलू लागते. अगदी गच्चीत कुंड्या ठेवून छान फुलझाडे लावून आवड जोपासले जाते. तसेच एखाद्या एखादी व्यक्ती नर्सरी चा व्यवसाय देखील करू शकते. त्यामध्येही फुलझाडे, शोभेची झाडे त्याच सोबत वड, पिंपळ विधीत मसाले आदी रोपे लावण्याचा फायदा ही जास्त होऊ शकतो. तसेच शेतीसाठी लागणारी बियाणे शेतीची साधने यांची ही लाखो रुपयांची उलाढाल होते यामुळे ही सुद्धा एक उद्योग संधी आहे.