Misal Darbar Franchise Available

महाराष्ट्रात अनेक पदार्थ खूप चांगले, चविष्ट आणि प्रसिद्धसुद्धा आहेत. त्यातीलच एक म्हणजे मिसळ. मिसळ म्हंटलं की डोळ्यासमोर येतो तर्रीदार रस्सा, फरसाण, बारीक चिरलेला कांदा आणि लिंबू.

महाराष्ट्रात अनेक पदार्थ खूप चांगले, चविष्ट आणि प्रसिद्धसुद्धा आहेत. त्यातीलच एक म्हणजे मिसळ. मिसळ म्हंटलं की डोळ्यासमोर येतो तर्रीदार रस्सा, फरसाण, बारीक चिरलेला कांदा आणि लिंबू. आणि हिच मिसळ अठरा प्रकारच्या वैविध्यपूर्ण चवींमध्ये मिळाली तर या सारखे दुसरे सुख नाही.

इतर पदार्थांप्रमाणे महाराष्ट्रीयन चवीच्या पदार्थांना बाजारात प्रसिद्धी मिळवून देण्याच्या उद्देशातून सचिन विंचवेकर यांनी धनकवाडी पुणे येथे डिसेंबर 2017 रोजी मिसळ दरबारची सुरुवात केली.

2010 ते 2014 या कालावधीत त्यांनी मिसळीच्या संबंधीत संशोधन करून 70 प्रकारच्या मिसळीच्या मसाल्यांची निर्मिती केली. सध्या बाजारात मिसळ दरबारच्या नैसर्गिक चवीच्या, रंगाच्या आणि प्रिसर्व्हव्हेटिव्ह विरहित 18 प्रकारच्या मिसळ उपलब्ध आहेत. तसेच प्रिमियम, गोल्डन, सिल्वर आणि प्लॅटिनम अशा चार प्रकारात मिसळ दरबारची franchise उपलब्ध आहे. सध्या पुणे, मुंबई, बारामती, फलटण या ठिकाणी त्याच्या फ्रेंचायसी सुरू आहेत. सचिन विंचवेकर यांनी 15 देशांमध्ये आपली मिसळ टेस्टिंगला पाठवली असून 2040 पर्यंत संपूर्ण जगात 1000 शाखा सुरू करणे हे त्यांचे ध्येय आहे. तसेच प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्याकडून मिसळ दरबारच्या मिसळीला बेस्ट मिसळ हा पुरस्कार देखील मिळाला आहे.

द महाराष्ट्र उद्योग 

आता मराठी उद्योजकच,  नवीन मराठी उद्योजक तयार करणार !!! 

 द महाराष्ट्र उद्योग मार्फत जर तुम्ही फ्रेंचायसी घेतली तर तुम्हाला, केंद्र आणि महाराष्ट्र शासन अनुदान योजना यांचा लाभ मिळेल.  तसेच स्टॅन्ड अप इंडिया, मुद्रा लोन, व्याज परतवा, बीज भांडवल यासह या व्यवसायांना विविध राष्ट्रीयकृत, सहकारी आणि कॉर्पोरेट बँका ह्या विना व्याज, विना तारण, विना जमीनदार 50 लाख पर्यंत कर्ज द्यायला तयार आहेत. 

अधिक माहितीसाठी संपर्क साधा.  - 8169717562  

Website -  https://themaharashtraudyog.com/