ITI | आयटीआयचं शिक्षण घेत असलेल्या किंवा घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी

ITI | आयटीआयचं शिक्षण घेत असलेल्या किंवा घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी

आता ही महत्वाची बातमी म्हणजे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतलेल्या एका निर्णयानुसार कोणत्याही ट्रेडमधून आयटीआयचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पोलिटेक्निकच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश मिळणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

सुरुवातीला आयटीआयमधून प्रशिक्षण पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी पॉलिटेक्निकला प्रवेश घेऊन पदवी घेता येते, परंतु आतापर्यंत आयटीआयमधून ज्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण पूर्ण केले त्याच ट्रेडमध्ये पॉलिटेक्निकच्या दुसर्‍या वर्षाला विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत असे, मात्र या निणर्र्यामध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून आता बदल करण्यात आला आहे. या नव्या बदलानुसार आयटीआयमधून व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकच्या थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या कोणत्याही शाखेत प्रवेश घेता येणार आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून 2 जून 2022 म्हणजेच काल पदविका अभ्यासक्रम (पोलटेक्निक) प्रवेश प्रक्रिया २०२२-२३ (Diploma Course (Polytechnic) Admission Process 2022-23) ऑनलाइन प्रणाली पोर्टलचे उद्घाटन वडाळा विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयात शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते करण्यात आले. 

पॉलिटेक्निक मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाच्या तीन फेऱ्या असणार आहेत. पोलिटेक्निक प्रवेशाची एक फेरी गेल्यावर्षी करोनामुळे कमी करण्यात आली होती. यंदा मात्र एक फेरी वाढविण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

दहावी निकाल जाहीर होण्याआधी १५ दिवस पोलटेक्निक अभ्यासक्रमाचा फॉर्म भरण्यात येणार असून दहावी निकाल जाहीर झाल्यानंतर या पोर्टलवर बोर्डाकडून अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचे मार्क अपलोड होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पुन्हा कागदपत्र घेऊन फिरण्याचा त्रास कमी होणार आहे.

त्याचबरोबर कोरोना काळात आपले आई - वडील गमावलेल्या विद्यार्थ्यांना २६० पोलटेक्निक कॉलेजमध्ये २ जागा राखीव असणार आहेत. अशी महिती देखील शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी त्याच्या पत्रकारपरिषदेदरम्यान दिली आहे.