प्रभादेवी मंदिरा समोरच मराठी तरुणीची पाणीपुरी अवनि वॅन!!!

1 / 1

पाणीपुरी म्हटले कि रस्त्यावर भैय्याचा पाणीपुरी स्टॉल असतो आणि आपण त्याच्याकडील पाणीपुरी मोठ्या चवीने खातो भले मग ते पाणीपुरी चे पाणी दूषित किंवा त्याचे हाथ किळसवाने असोत.
पण ह्याला मात करून अक्षदा भारेकर ह्या तरुणीने तिच्या पतीच्या पाठिंब्याने अवनि वॅन वर विविध फ्लेवर च्या पाणीपुरी स्टॉल बनवलाय.
गेले 7 वर्ष ती हा व्यवसाय ह्या परिसरात फूटपाथवर करत होती परंतु अपुरी जागा आणि इतर बऱ्याच प्रसंगाना ती तोंड देत होती आणि अशातच महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेना अध्यक्ष श्री. यशवंत किल्लेदार ह्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी आमच्या कार्यालयात संपर्क केला. आज त्यांना विना तारण, विना जामीनदार, विना व्याज आणि एकही रुपया ना गुंतवता अवनि पाणीपुरी वॅन करून दिली. शिवाय ह्या बरोबर ह्या वॅन मध्ये हैजेनिक कुल्लड पिझ्झा पासून इतर मराठामोळे खाद्यपदार्थ उपलब्ध होणार आहेत.
ह्या वॅन चे उदघाटन यशवंत किल्लेदार ह्यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
तर मग बंधू भगिनींनो प्रभादेवी ला सिद्धिविनायक येत असता ना तर आमच्या अक्षदा ताईच्या वॅन वर भेट द्या आणि मनमुराद पाणीपुरीचा आस्वाद घ्या.
धन्यवाद
अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र