अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र चॅनेल पार्टनर सेमिनार यशस्वी!!!!

1 / 1

महाराष्ट्रतील स्थानिक भूमिपुत्रांना व्यवसाय करता यावा ह्याकरिता आज 18 मार्च 2023 रोजी पत्रकार भवन, मुंबई येथे
महाराष्ट्रच्या विविध जिल्ह्यातून "अवनि" लघुउद्योग फिरते विक्री केंद्र च्या चॅनेल पार्टनरचे सेमिनार आयोजित करण्यात आले होते.

ह्याकरिता "अवनि वॅन "चे संस्थापक अनिल फोंडेकर आणि प्रज्ञा मोहिते ह्यांनी उपस्तिथ चॅनेल पार्टनर्सना मार्गदर्शन केले.

ह्या प्रसंगी ज्या चॅनेल पार्टनर्समुळे काही लाभार्थ्यांना अवनि वॅन घेण्यास सहकार्य मिळाले त्या चॅनेल पार्टनर्सना प्रत्येकी 10000 रुपये कमिशन म्हणून धनादेश सुपूर्द करण्यात आले.

ह्या सेमिनारचे सूत्रसंचालन दर्शन वातकर ह्यांनी केले शिवाय ह्या सेमिनारसाठी
शमिन भोसले, अभिषेक फोंडेकर, ओमकार फोंडेकर,आर्या मोहिते, सिद्धी बामणे ह्यांनी विशेष मेहनत घेतली.

सदर सेमिनारमध्ये भविष्यात महाराष्ट्रतील सर्वच जिल्ह्यात "अवनि" लघुउद्योग फिरते विक्री केंद्र व्यवसाय करताना दिसतील अशी विविध जिल्ह्यातील चॅनेल पार्टनर्सनी प्रतिज्ञा घेतली.

अनिल फोंडेकर


संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
www.avnivan.com