येत्या सहा महिन्यांत 86 टक्के कर्मचारी नोकरी सोडणार

आपल्या प्रत्येकासाठी पोटापाण्याच्या किंवा आपण म्हणूया उदरनिर्वाहाच्या दृष्टीने नोकरी हा एक महत्त्वाचा विषय आहे. पण, तुम्हाला माहितीये का की एका अहवालानुसार येत्या 6 महिन्यात 86 टक्के कर्मचारी हे आपल्या नोकरीचा राजीनामा देणार आहेत? तर मंडळी आजच्या भागात आपण याच विषयाबाबत माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया नक्की काय आहे ही बातमी आणि इतक्या कर्मचाऱ्यांनी एकाएकी नोकरी सोडण्यामागाची कारणं तरी काय आहेत?
तर, नोकरी आणि भरतीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मिशेल पेज एजन्सीने नोकरीच्या संबंधित एक अहवाल सादर केलाय आणि त्या अहवालातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे आणि ती बाब म्हणजे येत्या 6 महिन्यात 86 टक्के भारतीय कर्मचारी हे आपल्या नोकरीचा राजीनामा देणार आहेत. पण, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतके कर्मचारी नोकरी सोडतायत कशाला? तर, याची सुरुवात झाली ती लॉकडाऊनमुळे.
कोरोनाच्या काळात अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या तर, अनेकांनी वर्क फ्रॉम होम करत आपल्या नोकऱ्या टिकवल्या. पण, जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तेव्हा कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसमध्ये काम करण्यासाठी बोलवायला सुरुवात केली आणि त्याचमुळे अनेक कर्मचाऱ्यांनी असलेली नोकरी सोडण्याचा मार्ग निवडला. आता या परिस्तिथीमागे हे इतकंच कारण नसून यामागच अजून एक कारण म्हणजे 86 टक्के कर्मचाऱ्यांपैकी 61 टक्के भारतीय कर्मचारी हे आपला वर्कलाईफ बॅलेन्स सांभाळणं आणि एक आनंदी, तणावमुक्त जीवन जगणं जास्त महत्वाचं वाटू लागलाय आणि त्यामुळे अगदी गल्लेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून, कमी पगार असलेली, प्रमोशन मिळत नसलेली नोकरी करण्याची तयारी देखील आता हे कर्मचारी दाखवत आहेत.