पोस्ट ऑफिसची फ्रँचायजी घेऊन फक्त 5000 सुरू करा आपला व्यवसाय...

संदेश, पत्र, भेटवस्तू यांच्या देवाणघेवाणीसाठी अजूनही विश्वासार्ह मानलं जाणारं आणि कमी गुंतवणुकीतून लोकांना गेली अनेक वर्ष फायदा करून देणारं पोस्ट ऑफिस आता उतरलंय गुंतवणुकीच्या क्षेत्रात आणि त्यामुळे अनेक सामान्य नागरिकांना देखील फक्त 5000 व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. आता ते कसं ते पाहूया.
देशात पोस्टाच्या दीड लाखांपेक्षाही जास्त शाखा असल्या, तरी कामाचा वाढलेला ताण पाहता, आणखी काही नव्या शाखा सुरु करण्याची गरज असल्यामुळे पोस्टाने आपल्या व्यवसायाची फ्रेंचायजी देण्याचा निर्णय घेतला आहे आणि पोस्टाची फ्रँचायजी सुरु करण्यासाठी तुम्हाला फार नाही तर फक्त 5000 रुपयांची गुंतणूक करणं आवश्यक आहे.
पोस्टाच्या दोन प्रकारच्या फ्रँचायजी आहेत. फ्रँचायजी आउटलेट (Franchise Outlet) व पोस्टल आउटलेट (Postal Outlet). त्यापैकी कोणतीही फ्रँचायजी तुम्ही सुरु करु शकता. त्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज करावा लागेल.
पात्रता:
★फ्रँचायजी घेणाऱ्या व्यक्तीचं वय 18 वर्षांपेक्षा अधिक असावं.
★भारताचा कोणीही नागरिक पोस्ट ऑफिसची फ्रँचायजी घेऊ शकतो.
★कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमधून उमेदवार 8 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
किती कमाई होते..?
– नोंदणीकृत वस्तूंच्या बुकिंगसाठी, प्रत्येक व्यवहारामागे 3 रुपये कमिशन मिळतं..स्पीड पोस्ट (Speed Post) बुकिंगसाठी 5 रुपये कमिशन मिळतं.
– मनी ऑर्डर (Money Order)- 100 ते 200 रुपये मनी ऑर्डरसाठी साडेतीन रुपये, 200 रुपयांवरील मनी ऑर्डरसाठी 5 रुपये कमिशन दिलं जातं. फ्रँचायजीसाठी मनी ऑर्डरची कमीत कमी मर्यादा 100 रुपये आहे. त्यापेक्षा कमी रकमेची मनी ऑर्डर बुक करता येत नाही.
– 1000 नोंदणीकृत आणि स्पीड पोस्टच्या बुकिंगचं मासिक लक्ष्य पूर्ण केल्यास 20 टक्के अतिरिक्त कमिशन मिळतं.
– पोस्टाची तिकीटं आणि स्टेशनरी विक्रीवर 5 टक्के कमिशन निश्चित केलंय. महसुली शिक्के, केंद्रीय भर्ती शुल्क तिकीटांच्या विक्रीसह किरकोळ सेवांसाठी 40 टक्के कमिशन दिलं जातं..