महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ मर्यादित

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ मर्यादित

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ १९७८ पासून
अनुदान / बिज भांडवल योजना : या योजनेअंतर्गत 50,000 रुपयांपर्यंत प्रकल्प गुंतवणूक असलेल्या व्यवसायांना आर्थिक मदत दिली जाते. 10,000 / किंवा 50% अनुदान महामंडळाकडून दिले जाते आणि 50% राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात दिले जाते. १९७८ ते जानेवारी २०१७ या कालावधीत एकूण ५,५१,२९७ लाभार्थ्यांना २६२ कोटी ७८ लाख ८७ हजार रुपये देण्यात आले आहेत.
मागासवर्गाच्या उन्नतीसाठी व कल्याणासाठी स्वत:च्या जबाबदारीवर किंवा सरकार, सांविधिक संस्था, कंपन्या, भागीदारी संस्था, व्यक्ती यांच्या सहयोगाने किंवा अशा संघटना, अभिकरणे यांच्यामार्फत कृषि विकास कार्यक्रम, कृषी उत्पादनांचे पणन, प्रक्रिया व त्यांचा पुरवठा आणि साठा, लघु उद्योग, इमारत बांधकाम, वाहतूक आणि वैद्यकीय, अभियांत्रिकी ,कृषि इत्यादींसारखा इतर धंदा, व्यवसाय,व्यापार किंवा कार्यक्रम यांच्या माध्यमातून योजना आखणे, प्रचालन करणे, मदत करणे, सल्ला देणे, सहाय्य देणे, वित्तीय सहाय्य देणे, संरक्षण देणे आणि उपक्रम हाती घेणे.
महामंडळामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील आर्थिक दृष्टया दुर्बल व दारिद्रय रेषेअंतर्गत जीवन जगणा-या व्यक्तींना अस्वच्छ सफाई कामगारांच्या आश्रितांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजनेअंतर्गत स्वयंरोजगारासाठी आर्थिक योजना राबविणे तसेच प्रशिक्षण देणे.

अधिक माहितीकरिता
 https://mpbcdc.maharashtra.gov.in/