IBPS | आयबीपीएस - बँकिंग क्षेत्रातील प्रवेशद्वार

आयबीपीएस - बँकिंग क्षेत्रातील प्रवेशद्वार गेली दहा वर्ष आयबीपीएस हे नाव सर्वपरिचित झालेले आहे आयबीपीएस मार्फत सर्व नॅशनलाईज बँकांमध्ये ऑफिसर तसेच क्लेरिकल च्या जागा भरण्यात येतात त्याशिवाय रीजनल रूरल बँकांमध्ये ही अधिकारी व लिपिक पदासाठी होणारी भरती प्रक्रिया आयबीपीएस मार्फत होते. स्टेट बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया नाबार्ड किंवा काही को-ऑपरेटिव्ह बँकांमधील वरती देखील आयबीपीएस मार्फत होते म्हणजेच या बँकांसाठी होणारी भरती प्रक्रियेसाठी ची परीक्षा पूर्णपणे आयबीपीएस मार्फतच घेतली जाते आज आपण आयबीपीएस मार्फत निघालेल्या राष्ट्रीयकृत बँकांनी मधील लिपिक पदासाठी माहिती या लेखात पाहणार आहोत इन्स्टिट्यूट ऑफ बँकींग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) आपल्या सहयोगी 11 बँकांमधील क्लेरिकल कॅडरच्या सन 2023-24 मधील एकूण रिक्त 5,972 पदांच्या भरतीसाठी कॉमन रिक्रूटमेंट प्रोसेस (CRP Clerks-XII) सप्टेंबर/ऑक्टोबर 2022 मध्ये आयोजित करणार आहे. महाराष्ट्रातील रिक्त पदे - एकूण 775. (28 पदे दिव्यांग कॅटेगरी HI - 7, OC - 8, VI - 7, ID - 7 साठी राखीव; 95 जागा माजी सैनिकांसाठी राखीव) (1) बँक ऑफ इंडिया - 157 पदे (अजा - 15, अज - 14, इमाव - 42, ईडब्ल्य्ाूएस् - 15, खुला - 71). (2) कॅनरा बँक - 12 पदे (अजा - 1, अज - 1, इमाव - 3, ईडब्ल्य्ाूएस् - 1, खुला - 6). (3) पंजाब अँड सिंध बँक - 12 पदे (अजा - 2, इमाव - 2, ईडब्ल्य्ाूएस् - 1, खुला - 7). (4) UCO बँक - 28 पदे (अजा - 3, अज - 3, इमाव - 8, ईडब्ल्य्ाूएस् - 2, खुला - 12). (5) सेंट्रल बँक ऑफ इंडिया - 345 पदे (अजा - 34, अज - 31, इमाव - 93, ईडब्ल्य्ाूएस् - 35, खुला - 152). (6) य्ाुनियन बँक ऑफ इंडिया - 221 पदे (अजा - 26, अज - 23, इमाव - 67, ईडब्ल्य्ाूएस् - 19, खुला - 86). गोव्यातील रिक्त पदे - एकूण 71 पदे. (1) बँक ऑफ इंडिया - 8 पदे. (2) कॅनरा बँक - 15 पदे. (3) सेंट्रल बँक ऑफ इंडिया - 31 पदे. (4) य्ाुनियन बँक ऑफ इंडिया - 9 पदे. (5) पंजाब नॅशनल बँक - 8 पदे. महाराष्ट्रातील सहयोगी बँकांमधून BOB, Bank of Maharashtra, Indian Bank आणि IOB यांनी रिक्त पदांचा तपशिल IBPS ला कळविलेला नाही. PNB यांनी शून्य पदे कळविली आहेत. पदाचे नाव - क्लर्क. पात्रता - दि. 21.07.2022 रोजी पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण. वयोमर्यादा - दि. 1 जुलै 2022 रोजी 20 ते 28 वर्षे (इमाव - 31 वर्षे; अजा/अज - 33 वर्षे; दिव्यांग - 38/41/43 वर्षे; विधवा/परित्यक्ता/ज्य्ाुडिशियली सेपरेटेड महिला - 35/38/40 वर्षे). प्री-एक्झामिनेशन ट्रेनिंग - सहयोगी बँका अजा/अज/दिव्यांग/अल्पसंख्यांक/माजी सैनिक उमेदवारांना निःशुल्क प्री-एक्झामिनेशन ट्रेनिंग औरंगाबाद, मुंबई, नागप्ाूर, प्ाुणे, पणजी इ. केंद्रांवर ऑगस्ट 2022 मध्ये आयोजित करणार आहेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना तशी नोंद करावी. कोरोनाच्या स्थितीमध्ये सुधार न झाल्यास प्री-एक्झामिनेशन ट्रेनिंग घेतले जाणार नाही. अर्जाचे शुल्क - अजा/अज/दिव्यांग/माजी सैनिक उमेदवारांसाठी रु. 175/- आणि इतर उमेदवारांसाठी रु. 850/-. ऑनलाईन प्रीलिमिनरी एक्झामिनेशन सप्टेंबर 2022 मध्ये. ऑनलाईन मुख्य परीक्षा - ऑक्टोबर 2022 मध्ये. निवड पद्धती - सीआर्पी ऑनलाईन परीक्षा - (अ) प्ाूर्व परीक्षा - (1) इंग्लिश लँग्केज - 30 प्रश्न, 30 गुण. (2) न्य्ाूमरिकल अॅ्बिलिटी - 35 प्रश्न, 35 गुण. (3) रिझनिंग अॅवबिलिटी - 35 प्रश्न, 35 गुण. प्रत्येक टेस्टसाठी वेळ प्रत्येकी 20 मिनिटे. एकूण 60 मिनिटे. एकूण 100 प्रश्न, एकूण 100 गुण. प्ाूर्व परीक्षेसाठी महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र - अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हाप्ाूर, लातूर, मुंबई/ठाणे/नवी मुंबई, नागप्ाूर, नांदेड, प्ाुणे, रत्नागिरी, सोलाप्ाूर. (ब) मुख्य परीक्षा - 190 प्रश्न, 200 गुण, वेळ 160 मिनिटे. (i) जनरल/फिनान्शियल अवेअरनेस - 50 प्रश्न, 50 गुण, वेळ 35 मिनिटे; (ii) जनरल इंग्लिश - 40 प्रश्न, 40 गुण, वेळ 35 मिनिटे; (iii) रिझनिंग अॅगबिलिटी अँड कॉम्प्य्ाुटर अॅरप्टिट्यूड - 50 प्रश्न, 60 गुण, वेळ 45 मिनिटे; (iv) क्कांटिटेटिव्ह अॅiप्टिट्यूड - 50 प्रश्न, 50 गुण, वेळ 45 मिनिटे. CRPXII परीक्षेचे माध्यम महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी इंग्लिश, हिंदी, मराठी आणि कोंकणी असेल. मुख्य परीक्षेसाठी महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र - औरंगाबाद, मुंबई/ठाणे/नवी मुंबई, नागपूर, प्ाुणे. प्रत्येक चुकीच्या उत्तराला प्रश्नास असलेल्या गुणांच्या 1/4 गुण वजा केले जातील. अंतिम निवड मुख्य परीक्षेतील गुणवत्तेनुसार केली जाईल. ऑनलाईन अर्ज www.ibps.in या संकेतस्थळावर दि. 21 जुलै 2022 पर्यंत करावेत.