(BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 113 जागांसाठी भरती

(BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 113 जागांसाठी भरती

(BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत समुदाय संघटक म्हणजेच community organizer पदाच्या 113 जागांसाठी भरती होणार आहे. ही भरती 11 महिन्यांच्या कंत्राटी (contract) कालावधीनुसार करण्यात येणार आहे.  तसेच या पदाकरीता अर्ज करण्यासाठी उमेदवाराचा महाराष्ट्र राज्यात अधिवास असणे आवश्यक आहे. संबंधित पदाकरीता अर्ज करण्याकरिता तुमच्याकडे कोणत्याही क्षेत्रातील पदवी म्हणजे graduation पुर्ण असणे आणि संबंधित पदाकरीता कमीत - कमी 2 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. या पदाकरीता उमेदवाराचा MS - CIT चा कोर्स पूर्ण असणे गरजेचे आहे. तसेच, मराठी टायपिंग स्पीड 30 शब्द प्रती मिनिट आणि इंग्रजी टायपिंग 30 शब्द प्रती मिनिट असणे गरजेचे आहे. पदाकरीता वयाची अट 18 ते 38 वर्ष असून मागासवर्गीय म्हणजेच Reserved Caste करिता 5 वर्षांची सुट देण्यात आली आहे. या पदाकरीता अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, 28 जून 2022. आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे, सहाय्यक आयुक्त (नियोजन) यांचे कार्यालय, 5 वा मजला, जनता क्लॉथ मार्केट इमारत, हॉकर्स प्लाझा, सेनापती बापट मार्ग, दादर (प), मुंबई- 400028. या भरतीबाबत अधिक माहितीकरिता तुम्ही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अर्थात BMC च्या portal.mcgm.gov.in या अधिकृत संकेतस्थळा भेट देऊ शकता