नोकरीं आणि व्यवसायाचे एकमेव Youtube चॅनेलची सुरुवात लवकरच “द महाराष्ट्र रोजगार 24 “

काय नाही केले मराठी तरुणांसाठी,,, कुठलीही जातपात, धर्म न बघता महाराष्ट्रतील अगदी गावखेड्यापासून ते शहरातील मराठीच तरुणांसाठी *महाराष्ट्र रोजगार हे प्रिंट वर्तमानपत्र प्रकाशित केले. जगात डिजिटल क्रांतीचे युग चालू असताना आम्ही मागे कसे राहू म्हणून मराठीच तरुणांसाठी www.themaharashtrarojgar24.in जॉब पोर्टल सुरु केले. विविध क्षेत्रातील प्रायव्हेट सेक्टर मधील जॉब्स च्या थेट interview करिता मराठीच तरुणांसाठी रोजगार मेळावे घेतले. आमची मुले व्यवसायात मागे म्हणून विविध ठिकाणी मराठीच तरुणांसाठी व्यवसाय मेळावे घेऊन मार्गदर्शन केले. महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या विविध व्यवसाय कर्ज, अनुदान योजना दाखवण्याचे काम फक्त मराठीच तरुणांसाठी केले. व्यवसाय बाजारपेठ, मार्केटिंग, ट्रैनिंग वगैरे मार्गदर्शन फक्त मराठीच *तरुणांसाठी केले. * आज इतक्या वर्षात मराठीच तरुणांसाठी रोजगार स्वयंरोजगार कार्य करताना एक प्रकारचा हुरूप येतो. होय मला माझ्या मराठीच तरुणांना नोकरीं आणि व्यवसायात जगात पहिल्या क्रमांकावर पाहायचंय.

Leave a Comment